वंचितच्या संवाद यात्रेने फाडले काँग्रेसच्फ्या बोगस विकासाचे बुरखे
नांदेड टुडे ,प्रतिनिधी नांदेड जिल्ह्य़ातील वाढलेली बेरोजगारी दूर करायची असेल तर नांदेड शहरात असलेल्या जुन्या मिल व उद्योगधंदे तात्काळ सुरू करा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी जनसंवाद रॅलीच्या समरोप सभेत केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड शहरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संवाद यात्रेदरम्यान शहरातील सर्वच वस्त्यातील काँग्रेसच्या कार्यकाळात झालेला बोगस विकास जनसामान्यांसमोर उघड करून वंचितने काँग्रेसच्या बोगस कामांचा बुरखा फाडला आहे .
मागील चाळीस वर्षात काँग्रेसने नांदेड शहरात सत्ता उपभोक्तांना नांदेड मधील नागरिकांची केवळ दिशाभूल केली असून शहरातील अनेक वस्त्यांमध्ये केवळ बोगस कामे करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपली घरे भरले आहेत.
आजही नांदेड शहरातल्या विशेषतः दलित, मुस्लिम व कामगारांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा कमालीचा अभाव आहे.
रस्ते, नाली याबरोबर शिक्षण व आरोग्याच्या व्यवस्था यापासून नांदेड शहरातील नागरिक कोसो दूर आहेत.
काँग्रेसने केवळ कागदावर विकास दाखविला असून तो प्रत्यक्षात मात्र कुठे दिसत नसल्याचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद म्हणाले.
चाळीस वर्षांपूर्वी नांदेड शहरात 20 हजार नागरिकांना बारा महिने रोजगार उपलब्ध होता. परंतु आज विकासाच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकाळात नांदेड शहरात बेरोजगार युवकांचे थवेच्या थवे निर्माण झाले आहेत.
वाढलेल्या बेरोजगारीमुळे नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीही वाढीस लागली आहे.
शहरात प्राथमिक शिक्षणापासून ते व्यवसायिक व उच्च शिक्षणासाठी कुठलाही दर्जा राहिलेला नाही. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात असणाऱ्या संस्थाचालकांनी खाजगी शाळांचे जाळे नांदेड शहरात निर्माण करून शिक्षणाचा बाजार मांडला आहे.
त्यामुळे सामान्य माणसाच्या मुलांना दर्जेदार शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे. चांगल्या व उच्च शिक्षणासाठी आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना स्थलांतरित व्हावे लागते.
आरोग्याच्या कुठल्याही सुविधा या शहराला उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. नाही म्हणायला मोठमोठी खाजगी रुग्णालय शहरात निर्माण झाली आहेत परंतु या रुग्णालयातून सामान्यांची कुचंबांना होते.
शहरातील सरकारी दवाखाने अगदीच मोडकळीस आल्याने गरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. शहरातील तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई औरंगाबाद अशा शहराकडे वळावे लागते.
अगदी आयटीआय किंवा पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्यांनाही या शहरात रोजगार मिळत नाही. काँग्रेसच्या दरम्यानच्या कार्यकाळात एकाही नव्या कारखान्याची निर्मिती झाली नाही.
उलट निजाम काळापासून असणारी उस्मानशाही मिल, एन. टी. सी. मिल, टेक्सकॉम, शिफ्टा, मैफको इत्यादी मिल्स व मीना बाजार सारखा मोठा बाजार या शहरात होते.
परंतु काँग्रेसच्या कार्यकाळात हे सर्व मिल्स बंद पडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या शहरात निर्माण झाली आहे. चाळीस वर्षांपूर्वी असलेले वैभव या शहराला आता उरले नाही . केवळ सत्तेचा हव्यास असणाऱ्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी या शहरात बोगस विकासाच्या नावावर आपली राजकीय पोळी शेकली आहे.
या शहराचा विकास करायचा असेल तर आगामी काळात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना सामान्यांनी रोखले पाहिजे व आपला व आपल्या मुलाबाळांचा विकास साधला पाहिजे असे आवाहन करतानाच या शहरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी जुन्या काळातील उद्योगधंदे व मिल नव्याने सुरू करण्यात यावे असे प्रतिपादन फारूक अहमद यांनी केले आहे.
सामान्य नागरिकांच्या समस्या व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांच्या नेतृत्वात निघालेल्या व सतत तीन दिवस चाललेल्या जनसंवाद यात्रेने नांदेड शहरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.
अनेक नागरिकांनी या संवाद यात्रेत आपल्या व्यथा व अडचणी मांडल्या. यावर आगामी काळात वंचित बहुजन आघाडी प्रकर्षाने काम करणार असल्याचे आश्वासन यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.
या रॅलीत वचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष आयुब खान व विठ्ठल गायकवाड यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!