नांदेड दि. १८ -एमजीएम कॉलेज, नांदेडच्या प्राचार्या गीता लाठकर, क्लार्क मोहन कदम यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करून अंशू पंढरीनाथ घाडगे या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे आणि कमलकिशोर कदम हे एमजीएम कॉलेजचे सर्वेसर्वा असून या फसवणुकीच्या प्रकरणाला पाठीशी घालत आहेत, म्हणून कमलकिशोर कदम, प्राचार्या गीता लाठकर, क्लार्क मोहन कदम आणि संबंधीत विद्यार्थी व त्याच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बा.रा. वाघमारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.सविस्तर हे की, एमजीएम कॉलेजचा विद्यार्थी अंशू पंढरीनाथ घाडगे बीई (कॉम्प्युटर सायन्स द्वितीय वर्ष) या विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी दुसऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे व मृत्यू प्रमाणपत्रावर मयत पत्नीच्या नावाचेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होते, तिथे दुसऱ्याच्या नावाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडले आहे. मयत व्यक्ती शासकीय कर्मचारी होता. शासकीय कर्मचाऱ्याच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही. मयत व्यक्ती हा संबंधित विद्यार्थ्यांचा नैसर्गीक पिता नाही. सबळ पुरावे सादर करून तक्रार दाखल केली असता प्रत्यक्ष कमलकिशोर कदम यांना भेटून सदर विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करणे, विद्यार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा मागण्या केल्या असताना समाजकल्याण खातं हें भ्रष्ट खातं आहे, त्यांच्या पत्राला आम्ही केराची टोपली दाखवतो, अशी भाषा ते वापरत आहेत.म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून कमलकिशोर कदम, प्राचार्या गीता लाठकर, क्लर्क मोहन कदम, विद्यार्थी अंशू पंढरीनाथ घाडगे व त्याच्या कुटुंबीयावर फौजदारीचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करून कॉलेजची मान्यता रद्द करावी आदी मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बा.रा. वाघमारे यांनी दिला आहे.

More Stories
अल-रिज़वान इंग्लिश स्कूल नांदेड की स्टूडेंट ने MBBS पास कर स्कूल और माता पिता का नाम उज्जवल कर दिखाया!
No Compromise का दूसरा नाम शहाजी उमाप है, नांदेड परिक्षेत्र के दबंग प्रामाणिक गतिशील पोलिस उप महानरीक्षक शाहजी उमाप की टीम की नांदेड लातूर ज़िलों मे रेड मे 1 करोड़ 42 लाख रुपये का माल ज़ब्त, 23 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज !
Al-Rizwan English School student completes MBBS From her early educational journey to becoming a doctor, Syeda Zufa Anam’s remarkable journey