माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांचे आयुक्तांना निवेदन
नांदेड दि.20,दिसंबर,2023- नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर व नगरसेवकांचा कार्यकाळ संपून वर्ष होत असले तरी आत्तापर्यंत महाराष्ट्र शासन व निवडणूक आयोगाने या ठिकाणी निवडणुका घेतल्या नाहीत. त्यामुळे शहरातील दैनंदिन कामे रडखडली असून अनेक विकास कामे ठप्प झाली.
त्यामुळे लोकप्रतिनिधींसह शहरातील नागरिकही ही हातबल झाले आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 13 मधील ठप्प झालेले विविध विकास कामे त्वरित करा अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी उपमहापौर अब्दुल गफार यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्ताकडे केले आहे.
गुल्लु दादा अदनान एक्टर यांच्या हस्ते नईम खान याना उत्कुष्ट मीडिया पार्टनर पुरस्कार.!
महाराष्ट्रसह नांदेड येथील नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपलेला आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधींची कार्यकारिणी अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा सर्व कारभार प्रशासनाकडे आहे. त्यामुळे दैनंदिन विकास कामात अनेक अडथळे निर्माण येत असून अनेक प्रभागाची समस्या गंभीर स्वरूपाची बनलेली आहेत.
नागरिकांना वेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिक सरळ प्रशासनाकडे आपल्या प्रभागातील समस्या मांडूही शकत नाही. लोकप्रतिनिधीला सांगितले तर लोकप्रतिनिधी सुद्धा हतबल झालेले आहेत अशा अनेक संकटांना सध्या नांदेड शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी त्यांच्या प्रभागातील महत्त्वाच्या समस्या एका निवेदनाद्वारे आयुक्ताकडे केली आहे. त्यामध्ये 1) जुन्या नांदेड शहरातील प्रभाग क्रं. 13 मधील बिलालनगर ते चौफाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळया पर्यंतचा रस्ता त्वरीत करण्यात यावे 2) ट्रेचिंग ग्राऊंड येथील असलेला कचऱ्याचे मनपा प्रशासन बायेमिनिंग करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करुन त्याचे बायोमीनिंग करण्यात येत आहे. तथापि सदरील कचरा या ठिकाणाहून उचलुन बोंढार बायपास पुलाजवळ टाकण्याचे त्यांचे आदेशात नमुद आहेत काय अथवा कोणाच्या आदेशान्वये तेथे टाकण्यात आला याची सखोल चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करण्यात यावी. 3) शहरातील नागरिकांना साल सन 2022-23 मध्ये जे पाणी पट्टी होती त्यावर 10 टक्के वाढ करुन पाणी पट्टी वाढ न करता अचानक रुपये 4300/- ची वाढ आकारण्यात आलेला असून भयंकर वाढ झाल्यामुळे नागरिक सदरची पाणी पाणी पट्टी भरण्यास तयार नसल्यामुळे मागील वर्षाच्या पाणीपट्टी करावर 10 टक्के वाढ होणे आवश्यक आहे. 4) मालमत्ता धारकांचा मालमता कर व पाणी पुरवठा पानी पट्टीच्या थकबाकीवरील शास्ती 100 टक्के सुट दिल्यास नागरिक संपूर्ण कर भरण्यास तयार असल्याने ती लवकरात लवकर घोषण करण्यात यावी. 5) महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शहरातील मालमता धारकांना व भुखंडाना नियमीतीकरण करण्यासाठी गुंठेवारी सुरु केल्यास उत्पन्नास वाढ होणार त्यामुळे गुंठेवारी पुर्ववत सुरु करण्यात यावी. 6) मनपा हद्यीतील प्रभाग क्रं. 13 मधील उर्दु घर येथील असलेल्या अर्धवट शॉपिंग कॉम्पलेक्सचे काम पूर्ण करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी. वरील प्रमाणे सर्व कामे पुढील 15 दिवसाचे आत मार्गी न लावल्यास आपल्या मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांनी महानगरपालिका प्रशासनास दिला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका शासनाने त्वरित घ्याव्यात अशी मागणी सर्व नागरिकांतून होत आहे.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!