बूथ क्रमांक १६ वर शंभर टक्के मतदान; तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सतर्कतेने मतदान शांततेत
NANDED TODAY: सुरेश राठोड, तालुका (प्रतिनिधी) माहूरनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २६ जुलै) पार पडलेल्या मतदानात माहूर शहराने लोकशाही प्रक्रियेप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्थापन करण्यात आलेल्या बूथ क्रमांक १६ वर तीनही मतदारसंघांतील सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शंभर टक्के मतदानाची उल्लेखनीय नोंद केली.

बूथ क्रमांक १६ वर अ मतदारसंघातील ३८ पैकी ३८, ब मतदारसंघातील १ पैकी १ आणि क मतदारसंघातील २ पैकी २, अशा एकूण ४१ पैकी ४१ मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ केला. सकाळपासूनच मतदान केंद्रावर उत्साही वातावरण पाहायला मिळाले. मतदारांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राध्यक्ष एल. जी. अय्यर यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

त्यांना टी. के. वायबसे, व्ही. यू. राऊत, व्ही. एच. नगराळे तसेच प्रेमदास चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. मतदान केंद्रावरील सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्यात आल्याने मतदारांना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी राजकीय वातावरण तापल्याची चर्चा असतानाही माहूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाला यश आले.

पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततापूर्ण, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडली.माहूर केंद्रावर झालेल्या शंभर टक्के मतदानामुळे मतदारांमधील लोकशाहीबाबतची जागरूकता आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांप्रती असलेली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जिल्हाभरात माहूरच्या या आदर्श मतदानाची चर्चा रंगली असून, शांततापूर्ण आणि शंभर टक्के मतदानाची नोंद करून माहूरने पुन्हा एकदा लोकशाहीचा आदर्श घालून दिल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

More Stories
माहूरचे सुरेश राठोड यांची नांदेड टुडे न्यूजमध्ये निवड !
Renowned social activists from Hyderabad, Telangana—Vara Lakshmi and Arshia Fatima—have joined the Human Rights and Peace Organization!
कमलकिशोर कदम, प्राचार्या गीता लाठकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बा.रा. वाघमारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी